आता भाग १, भाग २ आणि भाग ३ ह्या लेखांतल्या बऱ्याचश्या शुद्धलेखनाच्या चुका सुधारलेल्या आहेत;   तुमच्यापाशी तुमच्या लेखांच्या मूळ प्रती असतील तर त्यांच्याशी तुलना केल्यास कोठे कोठे सुधारणा करता आल्या ते तुमच्या ध्यानात येईल.

व्याकरणाच्या सुधारणेला कोठे वाव आहे, ह्याविषयीचे काम अद्याप चालू आहे. ... मात्र अश्या चुका फार असतील असे वाटत नाही. उदा. बऱ्याच ठिकाणी शब्दयोगी अव्यये / विभक्तिप्रत्यय मूळ शब्दाला जोडून न लिहिल्याचे दिसत आहे, हे बहुधा घाईघाईने लिहिताना झालेले असावे असे वाटते.

पुष्कळ ठिकाणी 'सुद्धा' ह्या अर्थी 'पण' वापरलेला आहे. हे बोली भाषेत ठीक वाटले तरी औपचारिक भाषेत 'ही'  किंवा 'सुद्धा' जास्त योग्य वाटेल असे वाटते.

व्याकरणातील / वाक्यरचनेतील हे/असे बदल कसे करावे/सुचवावे ह्याविषयी सुटसुटीत मार्ग निघतो का, ह्याबद्दल विचार झाल्याने वेळ लागला.

कळावे.