'ठार' हा शब्द केवळ जिवाशी संबंधित नाही. त्याचा अर्थ 'संपूर्ण' किंवा 'संपूर्णपणे' असा काहीसा आहे असे वाटते.

उदा. ठार बहिरा = संपूर्ण बहिरा (अधिक प्रयोग येथे पाहावे)

त्यामुळे जीव घेण्याविषयी काही सांगायचे असेल तर 'जिवे मारले' असे सांगणे अधिक नेमकेपणाने सांगितल्यासारखे वाटते.