मला वाटते की जुन्या शुद्धलेखनानुसार हा शब्द  'जिवें' असा असावा. आणि त्याचा अर्थ जिवानिशीं, जिवासकट, जिवासह असा असावा.
आणि ही तृतीया विभक्ती असावी. कारण पूर्वी सह, विना ही तृतीयादर्शक अव्यये होती.
म्हणजे नुसते शरीराला मारले असे नाही तर जिवासही मारले. मारूनच टाकले. अर्थात हा अंदाजच. (पण बहुधा बरोबर असावा.)