स्वतःच्या पसंतीचे कुठलेही चित्रपट प्रौढांनी जरूर बघावे.  हा चित्रपट तर बघावाच बघावा. निदान दोनदा तरी. एकदा पाहून दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, संवाद, देहबोली, संगीत यातले बारकावे आणि सौंदर्य एकदा पाहून लक्ष्यात येत नाही. पहिल्या वेळी   निसटलेल्या अनेक जागा पुन्हा पाहाताना कळतात.   (आणि शिवाय तेव्हढीच शंभर कोटींची मजल गाठायला मदत. )
आणि चित्रपटांमुळे समाज बिघडत किंवा सुधारत असता तर नेत्यांना समाज सुधारणे आणि देशद्रोह्यांना समाज बिघडवणे किती सोपे झाले असते!