आपण एकाच नावाचा उल्लेख केला आहे. त्यांना आता जावेही लागले आहे आणि अंतर्विरोध शमला आहे. पण अजूनही काही नावे चांगलीच संशयास्पद आहेत. कोणी बिल्डर आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय 'त्यांच्या एरियात' (जो महानगरातला अतिधनाढ्य भाग आहे) एक वीटही हलू शकत नाही. काही उद्योगपती आहेत, काही अजून काहीतरी. व्यापम आणि डाळ हे घोटाळे प्रचंड आहेत. व्यापम तर खरोखर सर्वव्यापी आणि सर्वपक्षीय आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही घोटाळ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी जीवहत्या झाल्या नसतील. असो. जे आडात तेच पोहोऱ्यात. वेगळे पाणी येणार कुठून?
आपले उपरोधात्मक लेख नेहमीच आवडतात.