"आंतरजालावर मूळ संस्कृत "मेघदूत" सापडले पण तात्यासाहेबांचे मेघदूत नाही इतकेच काय पण ते मागवावे तर "त्याची प्रत उपलब्ध नाही"असे उत्तर मिळाले."

काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्कला एका रद्दीवाल्याच्या दुकानात मला कुसुमाग्रजांच्या मेघदूत अनुवादाची सेकंडहॅंड प्रत मिळाली. पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'यशवंत देव' हे हस्तलिखित नाव आहे. काही पानांवर रागांची नावे नोंदलेली आहेत. संगीतकार यशवंत देव त्याच परिसरात राहत असल्यामुळे ही प्रत त्यांनीच रद्दीत काढली असण्याची शक्यता आहे. 

तुमचा लेख वाचून मला त्या पुस्तकाची आठवण आली. त्याची पीडिएफ फाईल ह्या दुव्यावरून उतरवून घेऊ शकता.