'ठार'चे  शब्दकोशातील अर्थ : अगदी, सपशेल, सर्वथा, पूर्णतः .
ठार बहिरा - पूर्णतः बहिरा. .  ठार मेला - पूर्णतः मेला.
ठार झाला - मृत झाला... ठार केले - मृत केले.
ठार  (हिंदी)  -  गारठा; हिमवर्षाव. 
मराठीतल्या  ठार या शब्दाचा  गारठा शब्दाशी काही संबंध असेल?.  ठार पडला म्हणजे गार पडला-मेला?
ठार बुडालो- सपशेल बुडालो
बाळे मालती, मालती, आपल्यावर आकाश कोसळले गं ! आपल्या घरावर आगीचा पाऊस पडला! बाळे, आपण ठार बुडालो !  --भावबंधन नाटकातील वाक्य.
किल्ल्यावरून आलेल्या एक तोफेच्या गोळ्याने आमच्याकडील एक सुभेदार (गोलंदाजांचा प्रमुख) ठार पडला. तसेच एक हवालदार ठार झाला. -- . द. ब. पारसनीसकृत राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र

अज्ञानी माणूस अध्यात्म्यात ठार आंधळा असतो असे सांगणारी ज्ञानेश्वरीतील एक ओळ : -
प्रतिष्ठेवर जो जगतो। मान सन्मानाची वाट पाहतो। सत्काराने ज्याला होतो। हर्ष।।
विद्येचा घालतो पसारा। पुण्य कर्माची पेटतो दवंडी। सारे काही करतो। कीर्तीसाठी।।
भात्यासारखा फुगतो। वारा गेला की पडतो। लाभाने किंवा हानीने। माजतो किंवा मरगळतो।।
भुकेले कुत्रे। जसे खाते नासके उघडे। तसे पैशाबद्दल। अज्ञानाचे।।
म्हणतो मीच तो एक। माझ्याच घरी ऐश्वर्य। मीच काय ते सर्व। जाणतो
मीच एक जाणतो। मीच केवळ प्रख्यात। गर्वाने संतुष्ट। आणि ताठ।।
रोग्याने वागावे बेताल। मग होते त्याची तळमळ। तशी ह्य़ाच्या पोटात मळमळ। दुसऱ्याच्या सुखाने
दिवा जसा वात वारा खातो। तेलाला पितो। आणि काजळी होऊन। उरतो।।
पाण्याने तडतडतो। फुंकला की विझतो। पसरला की। सगळेच भस्म करतो।।
फक्त मिणमिणतो। तेवढ्यानेच गरम होतो। एवढाच तो। विद्यावान असतो।।
मस्त खाणे पिणे। आणि स्वस्थ झोपणे। त्यात रोगाचे सुप्त असणे। हे न जो जाणे।। उपनिषदांकडे नाही कल। योगशास्त्राची नाही आवड। अध्यात्माचा। नाही गंध।। आत्मचर्चा हे शास्त्र। बुद्धीने होते प्राप्त। ही तर भली मोठी थाप। असे म्हणत सुटतो भन्नाट।। कर्मकांडाची असते जाण। पुराणे तोंडपाठ। ज्योतिषात निष्णात। तो म्हणेल ते घडते।।
कलेत निपुण। पाककलेत पटाईत। अथर्वातले तंत्र। ह्याच्या हातात।।
कामशास्त्राची संपूर्ण जाण। नाट्यशास्त्र तर पाठ। वेदांमधले मंत्र। स्वाधीन ह्य़ाच्या।।
कळतो ह्याला कायद्याचा विचार। जादूटोण्याचे प्रकार। शब्दांचे कोष। ह्य़ाचे चाकरदार।।
व्याकरणात तरबेज। तर्कशास्त्रात गाढ । केवळ अध्यात्मातच। ठार आंधळा।।
अध्यात्म हेच खरे तर एकत्व। ते सोडून शोधतो सर्वत्र। नक्षत्राने नाही उजाडत। जळो हा।।
मोरांची पिसे। त्यावर असतात शंभर डोळे। पण ते तर आंधळे। तसे हे॥॥


जिवें ही निश्चितच जीव या शब्दाची तृतीया विभक्ती आहे;  जीवीं ही सप्तमी आहे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं  धरावे .. मनाचे श्लोक
जिवें वाचणे - (मोठे संकट टळून) जिवानिशी (जिवंत) राहणे.
जिवें मारणे - जिवानिशी मारणे

देवा केली तुझि आरती। पंच प्राणाच्या ज्योति
जिवे भावे ओवाळती। माझ्या खंडोबाची मुर्ती ... जेजुरीच्या खंडोबाची आरती