'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं आणि रेशनचं किडकं धान्य यावर आमचं बालपण गेलं', असं एकदा शिरीष कणेकरांनी म्हटलंहोतं.
रेशनचं किडकं धान्य याला पर्याय नव्हता. पण 'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं याला पर्याय होते. नेहरूंची भाषणं ऐकण याला नेहरूंची भाषणं न ऐकण असा सोपा आणि मोफत मिळणारा पर्याय होता. तो आम्ही भरपूर वापरला. आमच बालपण कुमारांचा शंकरा (सिर पे धरी गंग); सलामत अली नजाकत अली यांचा मधुवंती (तुमरे दरस को); माणिक वर्मा यांचा श्याम कल्याण (जियो मेरो लाल, सावन की सांझ); बाबूजींच गीत रामायण; वगैरे ऐकण्यात गेल आणि सध्या आमच म्हतारपण सुद्धा तेच ऐकण्यात जात आहे. बाय द वे, हे नदीम श्रावण कोण ? काही गाण-गिण करतात का?