प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
मला वाटतं दोघेही (खरं तर वृत्तबद्ध लिहिणं ही जबाबदारी धरून गीतकारासकट तिघेही) जबाबदार आहेत;  पण ध्वनीमुद्रणासाठी गीतकार असेलच असं नाही आणि जरी गीत वृत्तात नसलं तरीही शब्दांतले ऱ्हस्व-दीर्घ पाळणं, यतीभंग जर होत असला तर त्यानुसार गाण्याच्या चालीत सुरावर ठेहेराव आणूम, मींड घेऊन इ. प्रकारांनी शब्द न तोडणं यांसाठी संगीतकार जबाबदार.
शेवटी, जरी काही ठिकाणी ओढाताण होत असली तरी , त्याकडे दुर्लक्ष न करणं आणि संगीतकाराच्या चालीत जरी असं होत असलं तरी ते टाळणं आणि शक्यतो त्याला दाखवून देणं ही गायकाची जबाबदारी. (जगजीत सिंग यांच्या गाण्यांतून हे अगदी नेहमी लक्षात येतं, अगदी चाल त्यांची नसली तरी.)
 कारण शब्दप्रधान गायकीची जाण दोघांना - तिघांनाही हवी.
अर्थात,  प्रत्यक्ष त्या गाण्यांच्या वेळी काय झालं असेल आपल्याला कुठे माहिती आहे? मी लिहिताना कुणाला दोष देण्याचा प्रयत्न केला नाहीये, फक्त ते गंमत म्हणून दाखवलं आहे इतकंच!

- कुमार