मराठीत च, छ, ज, झ, प यांचे प्रत्येकी दोन उच्चार होतात आणि ते दाखविण्यासाठी विनोबा भावे, यू. म. पठाण, अविनाश बिनीवाले यांसारखे लेख नुक्त्याचा वापर करीत आले आहेत. त्यामुळे मराठीने नुक्ता स्वीकारावा का या प्रश्नाचे उत्तर निश्चित होकारार्थी आहे.
उच्चारकोशात नुक्तायुक्त अक्षरे वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. मनोगतावर नुक्ताधारी अक्षरे सहज टंकता येतात.
उदा० च़ आणि च; छ़ आणि छ, ज़ आणि ज; झ़ आणि झ; फ़ आणि फ वगैरे.
छ़ हे अक्षर असलेला शब्द मराठीत नसला तरी वत्स, वत्सल या शब्दांच्या उच्चारांमध्ये छ़ हा उच्चार ऐकू येतो. (वत्सचा मराठी उच्चार वत्स नसून तो वत्छ़ असा आहे.)
ड-ड या अक्षरांचे मराठी दोन-दोन उच्चार आहेत हे मी यापूर्वी मनोगतावर लिहिले होते. वाडा आणि डावा या दोन शब्दांत ड चे उच्चार वेगळे आहेत हे सहज लक्षात येते.