कवितेचं नावच दुर्बोध कविता आहे. अर्थ आपण लावाल तो लागेल. माझ्यामते निसर्गाच्या अंतरी वेगळेच काहीतरी असते आणि तो नवनिर्मिती करीत असतो, पण आपल्याला मात्र थांगपत्ता  लागत नाही. आपण वरवर निसर्गाच्या सृजनाबद्दल अंदाज करतो. बऱ्याच वेळेला तो चुकतो. क्वचितच वरोबर आला तर आपण निसर्गाचा अंदाज आल्याचे म्हणतो. पण तसे नसते. नवनिर्मिती कोणतीही असू शकते. एवढंच मला सांगायचं आहे. कविता दुर्बोध असल्याने कोणाला काय सापडेल सांगता येत नाही. पाहा आपल्याला ऱ्हिदम सापडला. ही कविता विचार आले तशी लिहिली आहे. प्रतिसादाबद्दल आभार.