परंतु लेखनाचा उद्देश विचारला म्हणून आश्चर्य वाटले.
धार्मिक साहित्य/ग्रंथाचे माझे फारसे काही वाचन नाही. म्हणजे जवळ जवळ शून्यं म्हणा ना. श्री रामदास स्वामींबद्दल माहिती नाही असा मराठी माणूस विरळाच.
योगायोगाने मला (माझ्याच घरात) श्री ग्रंथराज दासबोधाची एक आवृत्ती मिळाली. तसेच अलिकडील काळात समर्थांच्या चरण पादुकांचे पुजन, किर्तन इ बद्दल ऐकण्यात, पाहण्यात आले. त्यावेळी मला वाटले समर्थांना देखिल नुसती, त्यांची अथवा त्यांच्या ग्रंथाची पुजाअर्चा करणे अपेक्षित नसणार. त्यांनी लिहिलेला ग्रंथ डोक्यावर मिरविण्यापेक्षा, त्यांनी दिलेला उपदेश आत्मसात करणे पण जरूरीचे आहे. म्हणून मी दासबोध वाचनाची सुरूवात केली. सुरवातीला त्यातील जुन्या काळातील (३००-४०० वर्षांपूर्वीची) मराठी भाषा वाचणे, समजणे जरा अवघड वाटले. आता काहीशी सवय व्हायला लागली आहे. परंतु मी जे वाचले आणि त्याचा जो अर्थ मला समजला आहे, तो बरोबर आहे की चुकीचा हे कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. म्हणून 'मनोगत' वर लिहिण्याचे ठरवले. कुणी यातील जाणकारानी हे वाचले, तपासले तर ते योग्य की अयोग्य कदाचित सांगू शकतील. म्हणून हा लेखनप्रपंच--- म्हणजे एकप्रकारे मला होत असलेल्या आकलनाची पुनर्पडताळणी करणेच आहे. समर्थांनी जे लिहीले/सांगितले, त्याचा मी चुकीचा अर्थ तर लावत नाही ना हे समजावे हा उद्देश. कारण माझ्या समजण्यात जर काही न्यून असेल तर अर्थाचा अनर्थ होणार आणि तोच बरोबर समजून मी कायमचा स्मृती मध्ये ठेवणार.
तुमच्या शंका इथे जरूर मांडाव्यात. मी यथाशक्ती उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच. किंवा अन्य जाणकार असतील त्यांच्यापर्यंत तरी त्या शंका जातील.
या लेखमालेसाठी एकमेव संदर्भग्रंथ "श्री ग्रंथराज दासबोध" हाच आहे. काही श्लोक "मनाचे श्लोक" आणि काही "करूणाष्टक" यातील आहेत.