हा विषय भारतीय मानसिकतेला भावलेला 'तारणहार' विषय आहे. त्यामुळे सध्याच्या बेधुंद, अस्वस्थ काळात (आणि दळण वळणाची अनिर्बंध साधने मात्र उपलब्ध असताना) , गुरुंना चांगले दिवस येणं अपरिहार्य आहे.
हे भवदीप कांग का कोण...... त्यांनी हा अथांग विषय संयतपणे हाताळला आहे असे तुमचे म्हणणे आहे. किती मोठे पुस्तक आहे? आणि त्यात शेवटी त्यांचे काय म्हणणे आहे? त्यामधे अद्याप 'फॉर्म' मध्ये असलेल्या गुरुंबद्दल काही नाही का? असल्यास त्या त्या गुरुंच्या शिष्यगणांना काही प्रॉब्लेम नाही काय?
सगळे लोक आमने सामने का नाही येत..... उदा हे गुरू - शिष्य आणि त्यांचे विरोधक, ऍलोपथिला नावे ठेवणारे आयुर्वेदिक डॉक्टर्स व ऍलोपॅथिक प्रॅक्टिशनर्स, काहे दिया परदेस मधली निशा व तो कोण बिल्डर विरुद्ध नचि.........
म्हणजे सगळे गुंते सुटतील ना... आणी मानवजातीचे कल्याणच होईल खरे काय ते बाहेर आले की!
