आमच्या लहानपणी 'शुभ बोल नाऱ्या.. ' अशी म्हण होती. नाऱ्या नेहमी तुमच्या मारुतीसारखेच बोलत असे. नाऱ्याची एक गोष्ट पण  सांगतात की घरातल्या एका कार्याच्या वेळी नाऱ्याला सांगितलं की तू ह्या शुभ कार्याच्या प्रसंगी तोंड बंद ठेव म्हणजे तोंडातून वाईट बाहेरच पडायला नको. तर तो म्हणाला,  "मी कशाला काय बोलतोय? मी आपला पिंडाएवढा भात खाईन आणि मढ्यासारखा पडून राहीन. "