प्रख्यात भारतीय गणिती भास्कराचाऱ्यांच्या 'सिद्धांतशिरोमणी'मधला ‘लीलावती' हा प्रथम खंड ६००हून अधिक वर्षे भारतभर
पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासला गेला. त्यातले पहिलेच प्रकरण ‘परिभाषा, म्हणजेच
तत्कालीन एकके व त्यांची कोष्टके यांसंबंधी आहे.
अंतर मोजण्यासाठी, आठ
यवांचे (एकमेकांना टेकवलेल्या आठ जवसाच्या दाण्यांचे) एक अंगुळ, २४ अंगुळांचा एक
हात, चार हातांचा एक दंड, २००० दंडांचा एक कोस - ही एकके भास्कराचार्यांनी सांगितली आहेत.
घनफळासाठी
‘खारीचा १६वा भाग द्रोण, द्रोणाचा ४था भाग आढक, आढकाचा चौथा हिस्सा प्रस्थ
आणि प्रस्थाचा चौथा भाग कुडव.
४ मुष्टी (मुठी) = १ निष्टिका
२ निष्टिका = १ अष्टिका
२ अष्टिका = १ कुडव
४ कुडव= १ प्रस्थ
४ प्रस्थ = १ आढकी
४ आढकी = १ द्रोण
१६ (कधीकधी २०) द्रोण = १ खार (कैली)
शिवाय ‘गुंजा- मासा- कर्ष- पल- ही सोने
तोलण्याची एकके होती.
भास्कराचार्यांच्या काळी ,
५ गुंजा = १ मासा
१६ मासे = १ तोळा (कर्ष)
४ कर्ष = १ पल
पुढे पेशवाईत ,
८ गुंजा= १ मासा
१२ मासे = १तोळा
८० तोळे= १ पक्का शेर ही प्रमाणे झाली.
भास्कराचार्यांनी दिलेली कवड्या-काकिणी-पण-द्रम्म’ ही चलनातील नाणी :-
२० कवड्या = १ काकिणी ( दमडी)
४ दमड्या = १ पण (पैसा)
४ पण = १ द्रम्म (पावली-चार आणे)
गणिताध्याय या तिसऱ्या खंडात कालमापनाची एकके आहेत. पापणीच्या
उघडझापीचा कालावधी म्हणजे ‘निमिष’, निमिषाचा ३०वा भाग ‘तत्पर’ आणि तत्पराचा
१००वा भाग ‘त्रुटी’ हे कालाचे अतिसूक्ष्म एकक भास्कराचार्यानी ग्रहांची
तात्कालिक गती काढण्यासाठी वापरले आहे.