'मारुती' प्रकारतल्या व्यक्तींना हळवेपण माहित नसते, असे वाटते. 'तुझे बाराव्याचे लाडू खाल्ल्याशिवाय मी नाही जाणार रे' हा संवाद माझे दोन मित्र जेव्हा जेव्हा भेटत, तेव्हा तेव्हा ऐकायला मिळे. त्यातील एक गेला व एक आहे; जो आहे तो अधिक 'मारुती' आहे. त्यामुळे त्याला मित्र कमीच आहेत.