माझ्या मते,
तू आली , मी आली हे मराठीचे हिंदिकरण आहे. आणि हे चुकीचे आहे.
"तू आलीस" आणि "तुम्ही आलात" असेच म्हटले पाहिजे.
"मी आले" असे म्हणायला हवे. "मी आली" हे हिंदिफिकेशन आहे.
"तू आलास" हे बरोबर. "तू आला" हे चूक, कारण पुन्हा तेच.

काही वेळा आपण फोनवर बोलताना विचारतो, तुम्ही घरात आहे काय? हेही वास्तविक चूकच आहे.
"तुम्ही घरात आहात का? असे विचारायला हवे!!