दुसरे असे, की कोणताही भाषाशास्त्रज्ञ बोलीभाषा या अशुद्ध आहेत, असे मानत
नाही. भाषेत शुद्ध-अशुद्ध, उच्च-नीच असे काही नसते. मराठीच्या संदर्भात
विचार केल्यास मराठीच्या पुणेरी, कोल्हापुरी, सोलापुरी, अहिराणी, वैदर्भी
अशा किती तरी बोली आहेत. त्या अशुद्ध आहेत, असे कोणीही म्हणत नाही.
भाषाशास्त्रात बोलीभाषांना कमी लेखलेले नाही. सारांश, मराठीशी आपली
बांधिलकी असेल, प्रेम, आपुलकी असेल, तर लेखनात प्रमाणभाषेला व लेखनविषयक
नियमांना विरोध करण्याची मुळीच आवश्यकता नाही.
माझ्या मते हे लेखाचे सार आहे. लेखिकेने अतिशय मुद्देसूदपणे प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यासंबंधी विवेचन केले आहे.