संस्कृत शब्द - रीति - त्याची तृतीया रीत्या.  वैयक्तिकरीत्या हा संस्कृत शब्द, म्हणून 'रीत्या'मधील री दीर्घ. 

रीति हा शब्द मराठीतही वापरता येतो, त्याची तृतीया रीतीने.

रीत हा मराठी शब्द; त्याची तृतीया रितीने.

'सर' हा मराठी प्रत्यय, तो फक्त मराठी शब्दाला लावता येतो, म्हणून रीतसर हा शब्द बनतो;  रीतिसर असा शब्द असू शकत नाही.

'बद्ध' हा संस्कृत शब्द, त्यामुळे रीतिबद्ध बनतो, रीतबद्ध होत नाही.  परंतु, रीति हा मराठी शब्द असलेला रीतिरिवाज फक्त रूढ आहे, रीतरिवाज नाही.

संस्कृतमध्ये 'रीति'ला  बोलायची किंवा लिहावयाची शैली असा एक अर्थ आहे,  त्यामुळे वैदर्भी रीति, गोंडी रीति, या शब्दरचना प्रचलित आहेत.