फार सुंदर विचार. अपत्यांना फारसे शिक्षण देऊच नये. स्वप्ने तर अजिबात बघू देऊ नयेत. सदाशीव पेठेत घर असावे; शिक्षण जवळ-पासच्याच एकाद्या कॉलेजात बीए, बीकॉम वगैरे पुरतेच मर्यादित ठेवावे. आयआयटी, आयआयएम वगैरे पासून तर दूरच राहावे. पैसे तर वाचतीलच, अपत्य परदेशीच काय साधे दिल्ली किंवा बंगलोर पर्यंत सुद्धा झेप घेणार नाही. जवळच एकाद्या बँकेत कारकुनी नोकरीत चिकटून घेणे येवढीच लघुत्वाकांक्षा ( हा शब्द महत्त्वाकांक्षा या शब्दाच्या विरोधार्थी ) असावी. मुलगी असल्यास सासर, व मुलाने वेगळा संसार थाटल्यास त्याचे घर, फारफार तर नवी पेठ या पेक्षा दूर असू नये. आजारपण झाल्यास सरकारी रुग्णालयात मोफत उपचारा करता लाईन मध्ये उभे राहून "पैश्याने का सगळी सुख विकत घेता येतात" असले तत्त्वज्ञान पाजळावे, व अंती मुलाच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडणे, येवढेच स्वप्न बघावे.