तुमच्या विचारातून लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. sarcastic बोलणे सोपे आहे, पण उपाय सुचवणे अवघड ! नाही का?
लेखात काही प्रश्न उपस्थित केले आहेत जसं की
- कायमस्वरूपी बाहेर गेलेल्या मुलांच्या पालकांची जबाबदारी कोणाची?
- उच्च शिक्षण घेणे आणि पैसे कमावणे ह्यात गैर किंवा चुकीचे काहीच नाही. पण आपल्या आई-वडिलांची जबाबदारी टाळून (किंवा त्याकडे दुर्लक्ष करून) अश्या स्वप्नांच्या मागे धावणे हे योग्य समजायचे का?
- "परदेशातच अपत्याला जन्म द्यायचा म्हणजे त्याला तिथलं ग्रीन कार्ड (पासपोर्ट/नागरिकत्व) मिळूनच जाईल हे आजकालचे विचार"- हे खरं नाही का?
- "आम्ही तर आई बाबांना म्हणतोच आहोत की तुम्हीच या आमच्या इकडे, पण ते यायला तयार नसतात" - हे तर सर्रास चालू आहे. मुलगा परदेशात राहून पालकांना तिकडे सांभाळायला तयार आहे. पण पालक जायला तयार नसतात. ह्या समस्येचे काय करायचं?