"आपल्या मुला/मुलीबद्दल आपण काय वेगळा विचार केला असता?" >>
फार वेगळा नाही. जो आजचे पालक आपल्या मुलांबद्दल करतात तोच विचार करणार.
लेखात मी म्हटलंय की कोणताही पालक आपल्या मुलाच्या स्वप्नांमध्ये आडकाठी करत नाही, करूच शकत नाही. विचार हे एका पाल्याच्या नजरेतून मांडले आहेत.
गावातून शहरात जाणारी मंडळी आहेत. त्यांच्या बाबतीतही हा प्रश्न 'कदाचित' येत असेलही. तसंही आजकाल तीन तीन मुलगे असून
पालकांना वृद्धाश्रमात ठेवलेलं आपण बघतोच आहोत.
लेखात उपस्थित केलेले काही प्रश्न असे आहेत:
- कायमस्वरूपी बाहेर गेलेल्या मुलांच्या पालकांची जबाबदारी कोणाची?
- उच्च शिक्षण घेणे आणि पैसे कमावणे ह्यात गैर किंवा चुकीचे काहीच नाही. पण आपल्या आई-वडिलांची जबाबदारी टाळून (किंवा त्याकडे दुर्लक्ष करून) अश्या स्वप्नांच्या मागे धावणे हे योग्य समजायचे का? (आज बाहेर जाताना पुढे असं होणार आहे हे कळत नसावं पण नंतर अशी वेळ दुर्दैवानं येते)