सुंदर विचार व प्रकटीकरण, चेतन. थोडे स्पष्ट व परखड वाटले तरी! तुमच्या वृद्धत्वाच्या चार स्टेजेस फार पटल्या. पहिल्या दोन मध्येच कार्यक्रम आटपावा हे उत्तम. !!
पण बरेच व्हॉटसप संदेश फिरत असतात.. की जेव्हा या देशातील एकूण एक वृद्धाश्रम बंद होतील तीच खरी प्रगती व तोच खरा प्रकाशाचा दिवस इ इ. !!
अशी आपल्या समाजाची मानसिकता आहेच आहे. भलेही हा संदेश फॉर्वर्ड करणारे स्वतः कितपत आईबापाला सांभाळतात हा वेगळाच मुद्दा.
तर मध्यम मार्ग म्हणजे स्वतःची वृद्धपणाची भरपूर आर्थिक सोय करून ठेवणे, मुलांनाही वेळोवेळी मदत करणे, आणि शक्यतो हातीपायी धडधाकट असतानाच वरचा मार्ग सुधारणे!!!!
भारतात अजून तरी ट्रस्टी वगैरे संकल्पना नाहीत. आणि एव्हढा पैसाही कुणाजवळ असतो? पण जो आहे त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.