तुम्ही लिहिलेत भलेही हा संदेश फॉर्वर्ड  करणारे स्वतः कितपत आईबापाला सांभाळतात हा वेगळाच मुद्दा. " स्वतः सांभाळतात" म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? स्वतःच्या हातांनी आई-बाबांचे डायपर बदलणे, का आई-बाबांचे डायपर बदलायची चांगली सोय असेल तिथे त्यांना ठेवण्याची व्यवस्था करणे?  आणि यातले काय चांगले ? तुम्ही बाबाच्या भूमिकेत असल्यास काय प्रेफर कराल? मुलाच्या भूमिकेत असल्यास काय प्रेफर कराल?

परिस्थिती फार गंभीर आहे. विज्ञानाचा फोरकास्ट असा आहे कि गेल्या काही वर्षात जन्माला आलेल्या बाळांचे टिपिकल आयुष्यमान १५० वर्षे असेल.  या वर "भलतेच काय? " असे म्हणण्या आधी हे लक्षात घ्या कि, टिपिकल आयुष्यमान ८० वर्षे  तर आत्ताच आहे. पण २०१७ साली जन्मलेले बाळ जेव्हां ८० वर्षाचे झालेले असेल, तो पर्यंत वैद्यकीय शास्त्राची आणखीन ८० वर्षे प्रगती झालेली असेल. ती लक्षात घेता, म्हणजे २०९७ साली  वैद्यकीय शास्त्र कुठे असेल हे लक्षात घेता त्या वेळी  टिपिकल आयुष्यमान शंभराच्या बरेच पुढे असणे अशक्य नाही.

पण जगण्याची मर्यादा वाढत असली तरी वार्धक्याने विकलांग होण्याचे वय होते तसेच आहे.  म्हणजे ९० वर्षे जगणाऱ्यां पैकी धडधाकट जगणारे विरळाच. बहुतेक करून "केवळ एक शरीर" असेच जगणारे. आता या दोन्ही गोष्टी, म्हणजे वाढते आयुष्यमान व पूर्वी येत होते तसेच येणारे वार्धक्य, यांचा एकत्रित विचार केला तर  लक्षात येईल कि ५० वर्षे वयाच्या मुलाला ( ? ) त्याचे ८०  वर्षे वयाचे बाबा, ११० वर्षे वयाचे आजोबा,  व १४० वर्षे वयाचे पणजोबा, यांचा सांभाळ करावा लागणार आहे.  तर,  प्रश्न फार गंभीर आहे.