लेख आजूबाजूच्या अनुभवांकडे बघून विचारपूर्वक लिहिलेला आहे.
म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करण्यात (अगदी डायपर वगैरे बदलणे) ह्यात मुलाला संकोच का वाटावा?
अशी कामे कोणालाच आवडत नाहीत. पण एक कर्तव्य म्हणून करायला हरकत नसावी.
अनेक घरांमध्ये आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करीत असणारे आजही आहेतच. एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून त्याने दाई ठेवावी अथवा स्वतः च सर्व करावं. सेवा किंवा सांभाळणे म्हणजे आई वडिलांना मुलाची जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा त्याने तिथे उपस्थित असणे आणि शक्य ते सर्व करणे. मग त्यासाठी परदेशात किंवा बाहेरगावी नाही जाता आलं तरी चालेल.
लहान मुलाला त्या आई बापानं ज्या पद्धतीनं सांभाळलं त्याच पद्धतीनं मुलानं आपल्या वृद्ध पालकांना सांभाळायची अपेक्षा ठेवणं चूक आहे का?
परदेशात जरूर जावं पण कायमचं तिकडचं होऊन जाण्यात काहीच अर्थ वाटत नाही. आपल्या पालकांसाठी नक्की परत यावं ह्या विचारांचा मी आहे. तिकडे राहून इकडे पालकांची 'व्यवस्था' लावणं मला बरोबर वाटत नाही. (ज्यांचे पाल्य बाहेर आहेत अश्या पालकांकडे बघून सांगतोय, फक्त मला वाटतं म्हणून नाही)

स्वतः वार्धक्याला झुकलेल्या मुलाला आपल्या आईवडिलांची सेवा करणं शक्य होत नाही हे वास्तव आहे. अश्या वेळेस नातवाने आजी आजोबांची सेवा करणं खूपच वाढीव ठरेल. (तसं करणारे सुद्धा माझ्या ओळखीत आहेत, पण असं फारच विरळ). ह्या वेळेस वृद्धाश्रमकिंवा तत्सम व्यवस्था हाच एक पर्याय राहतो.

आई वडिलांची अपेक्षा काय आहे ते मी लेखात कुठेच नमूद केलेलं नाही. उलट मी हेच म्हटलंय कि आपला पाल्य बाहेर राहिला तरी त्यांची हरकत नसते. ते प्रोत्साहनच देताना बघितले आहे.

पालकांनी सगळं सोडून मुलाच्या मागे दुसऱ्या देशात जाऊन राहणे म्हणजे म्हाताऱ्या पालकांकडून अति-अपेक्षाच म्हणायला लागेल ! एका घरातून जवळच्याच दुसऱ्या घरी राहायला गेलेले वृद्ध दाम्पत्य फार छान सुखकर, किंवा शांत  जगू शकतीलच असं नाही, कारण त्यांना जुन्या घराची, आजूबाजूच्या लोकांची सवय झालेली असते, तिथली आठवण येत असते. हे मी स्वतः बघितलं आहे.

दुर्दैवाने आपल्या समाजात तुम्ही म्हणताय तसे 'मोठे किंवा उदात्त' विचार करणारे पालक कमीच आहेत.
जर इथलं सगळं सोडून आई वडील मुलाकडे बाहेर देशात जायला तयार असतील (म्हणजे ते जर इतके पुढार-मतवादी असतील) , तर त्या आई वडिलांनी स्वत:च्या आयुष्याच्या संध्याकाळसाठी काही पुंजी आणि व्यवस्था नक्कीच करून ठेवली असणार. जेणेकरू त्यांना मुलांमागे धावत बसायची गरजच भासणार नाही.

"आता तू गाडी सुटे पर्यंत थांबण्याची गरज नाही. निघालास तरी चालेल."
"गाडी सुटेपर्यंत न थांबणे" आणि "आपल्या आई वडिलांना आपली गरज असताना त्यांच्याजवळ न थांबणे" ह्या फारच टोकाच्या गोष्टी झाल्या. पण तरीही जर कोणते पालक असे असतील (असेही पालक आहेत हे मला माहित आहे, पण कळकळीचे गालबोट लागलेलं आहेच), तर त्याहून उत्तम काय!

एखाद्या समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडून यायला वेळ लागतो, आणि आजूबाजूच्या अनुभवांवरून कदाचित ती वेळ अजून आलेली नाही असं मला वाटतं. त्यामुळे असा विचार मागील पिढीकडून करणं जरा जास्तीच होईल.
आजची तरुण पिढी त्यांच्या म्हणतारपणी हा विचार सहजतेने करू शकेल ह्यात शंका नाहीच.