नकळतेपणी उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचा हट्ट करणारे आहेत आणि सर्व काही समजून घेऊन, बाहेर शिक्षण घ्यायला जायचा विचारपूर्वक निर्णय घेणारेही ह्याच समाजात आहेत.
  
पण तुम्ही हे कसे ठरविले कि काही लोकांचा बाहेर जाण्याचा निर्णय हा विचारपूर्वक निर्णय नव्हता व नकळतेपणीचा हट्ट होता ? त्यांना तुमचे मत कळल्यास त्यांना कदाचित असे वाटेल कि त्यांचा निर्णय हा विचारपूर्वक निर्णय नव्हता व नकळतेपणीचा हट्ट होता असे तुम्हाला वाटणे हा तुमचा विचारपूर्वक निर्णय नसून केवळ नकळतेपणीचा हट्ट आहे 

आई वडिलांच्या अंत्य विधीला मुलगा काही करणाभावी येऊ शकला नाही, हे तर "काहीच्याकाही" म्हणावे लागेल. . . . . आणि असा विचार करणारे तुमच्या सारखे अनेक असतील तर ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

यात काहीही काहीच्याकाही नाही. तुमच्या लेखात ज्या अनेक त्रुटी आहेत त्या पैकी एक अशी, कि तुम्ही पाल्य भारतातच आहे किंवा परदेशात आहे, अशीच विभागणी केली आहे. पण भारतातच असणे म्हणजे आई-वडीलांच्या शेजारीच असणे, असे नव्हे. भारतातच हजारो दुर्गम्य जागा आहेत, लष्कर/ नौदल आहेत,  जिथे आई-वडिलांना नेता पण येत नाही, व तेथून २४ तासात घरी परतता पण येत नाही, याची तुम्ही दखल घेतलेली नाही. दुबईतून मुंबईला तीन तासात येता येते, सिंगापूर येथून सहा तासात, यूरोप मधून दहा तासात, व अमेरिकेतून पंधरा ते बावीस तासात. तुलनेत, गांगटोक (तिथे माझे पोस्टिंग पाच वर्षे होते), किंवा सियाचेन किंवा ऐझॉल किंवा पोर्ट ब्लेयर  (हे सर्व भारतातच आहेत) येथून मुंबईला यायला जास्त वेळ लागतो. सैन्यात असल्यास मागाल तेव्हां सुट्टी मिळेलच असे नसते. नौदलात - लष्करी वा मालवाहू - असल्यास एकदा समुद्रावर गेल्यास चार महिने परतता येत नाही, इथे काय वाट्टेल ते झाले तरी. 

माझ्या बाबतीत म्हणाल तर मी संपूर्ण शरीर देह-दान करून टाकले आहे. माझे कोणते अवयव ट्रान्स्प्लांट करता येतील ते मला मृत्यू कसा येईल त्यावर अवलंबून आहे. जे  ट्रान्स्प्लांट करता येत असतील ते ट्रान्स्प्लांट करावेत, इतर मेडिकल रिसर्च करता वापरावेत. अंत्यविधी पाहिजेच कशाला? दुर्दैव असे कि असा विचार करणारे माझ्या सारखे अजून तरी अनेक नाहीत.