बऱ्याच दिवसांनी साईटला भेट दिल्यानी आज हा लेख वाचनात आला. सगळ्या प्रतिक्रियाही अगदी बरोबर आहेत. आजकाल हिंदी मिश्रित मराठी ऐकून ऐकून आपल्याला तेच बरोबर वाटायला लागलं आहे. मी आले, तू आलीस, त्या आल्या. तसंच तुम्ही घरी आहे का? चूक. तुम्ही घरी आहात का? विदर्भात तर मी आणखी वेगळीच भाषा ऐकते. " तू घाबरू नको मी आहो तुझ्या सोबत. " हा काय प्रकार आहे कळत नाही. " मी आहे. " " आम्ही आहोत" . एखादी गोष्ट सांगताना ' हे कर ' असं न सांगता ' हे करशील. ' असं सांगतात. बरं वस्तूच्या तुलनेत क्रियापद बदललं पाहिजे हेही नाही कळत. एक चपाती ' खाल्ली ' नाही जात. दोन किंवा जास्त चपात्या खाल्ल्या नाही जात. पण तिथे एक चपाती पण खाल्ल्या नाही जात. भाषा बोलल्या जाते. आणि इतक्या वर्षात कोणालाही हे सुधारावंसं वाटलं नाही.