गडकऱ्यांनी लिहिलेल्या 'गुळाचा गणपती' ह्या पाककृतीची आठवण झाली.
गुळाचा गणपती
आपलेच तीन-चार वर्षाचे पोर घ्यावे. त्याला नेहमी स्वयंपाकघरात बसवून ठेवावे. नेहमी त्याच्या हातावर गोडधोडाचे काहीतरी ठेवीत जावे. त्याला इकडची काडी तिकडे करू देऊ नये. शाळेतसुद्धा जाऊ देऊ नये. खायला हवे तसे घालावे; पण जागचा हलू देऊ नये. लौकरच बसल्या जागी मुलगा अगदी गुळाचा गणपती होतो. हा पुष्कळ वर्षे टिकतो.
अश्या आणखी काही'पाककृती' येथे वाचायला मिळतील!