बहुतेक आपण त्याच काळात ११ वीला होतो. त्यावेळी विचित्र पर्याय उपलब्ध होते.
म्हणजे मला बीजगणित भूमिती हा विषय घ्यायचा होता तर त्याबरोबर सोशल स्टडीज असे इतिहास भूगोल नाग‌रीकशास्त्राचे कडबोळे घ्यावे लागे. बीजगणित भूमिती स्वतंत्र घेता येत होते व विज्ञान व रसायन हा स्वतंत्र विषय घेता येई तर तो नको असणाऱ्यांठी सामान्य शास्त्र ज्यात विज्ञान रसायन व जीव व वनस्पतिशात्र यांचे कडबोळे असायचे, अंकगणित हा स्वतंत्र विषय घेता येई पण आठवा विषय म्हणून घ्यावा लागे कारण काही विद्यापीठात त्याला मान्यता नव्हती. म्हनजे सात विषयात एक अंकगणित असेल तर महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाकडून पात्राता प्रमाणपत्र (एलिजिबिलिटी सर्टिफिकेट) मिळत नसे . मुंबई विद्यापीठाने माझ्या दुसऱ्या बहिणीचा मुंबईच्या रुइया कॉलेजचा प्रवेश रद्द ठरवला होता. असे विचित्र पर्याय असले तरी एलिमेंटरी मॅथ्स हा गणिताचा सोपा पर्याय, गेनेरल सायन्स हा शास्त्राचा सोपा पर्याय , संस्कृतला स्वतंत्र नाग‌.हास्त असे सोपे पर्याय उपलब्ध होते.उलट ज्यांना अधिक गुण मिळवावे अशी आकांक्षा असे ते आठवा विषय म्हणून अंकगणित, बीजगणित भूमिति, विज्ञान रसायन, संस्कृत हे अधिक गुण मिळवून देणारे विषय निवडत त्यावेळी गुणांची खिरापत वाटण्याची पद्धत नसल्यामुळे सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्यास जास्तीत जास्ती ८८-८९% गुण मिळत व निकालाची टक्केवारी जास्तीत जास्त ५०% असे.