भारतात जे अभियांत्रिकी पदवीधर नोकरीला लागतात, त्यातल्या किती जणांना खरोखर अभियांत्रिकीचे काम दैनंदिन जीवनात करावे लागते?
माझ्या मर्यादित निरीक्षणाप्रमाणे अगदीच थोड्यांना असे काम करण्याची संधी मिळते. बहुसंख्य तरुणांना इतरांच्या कामावर लक्ष ठेवणे अशी मुकादमाची कामे मिळतात, जी करण्यासाठी अभियांत्रिकीतल्या पदवीचा काही विशेष उपयोग नसतो. इतर तरुणही अशी कामे अनुभवाने करू शकतात, आणि त्यांच्या कामगिरीने भारतातल्या कंपन्यांच्या कामात काही अडत नाही.