"गणित" हा काही एक विषय नाही, अनेक शाखांचा गुच्छ आहे, आणि म्हणून "गणिताला" पर्याय असावा का नाही हा प्रश्नच मुळात चुकिचा आहे. माझ्या मते
१- सरळ, चक्रव्याढ व्याज; क्षेत्रफळ, नफा-तोटा, काळ-काम-वेग, काही अंशी अनुपात, इत्यादी सक्तीचे असले पाहीजे.
२- मात्र अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, को-ओर्डीनेट जिओमेट्रि,  कॅल्क्युलस, इत्यादी सगळ्यांना सक्तीने शिकविण्याचे कारण नाही.  समस्या अशी आहे, कि हे विषय नववी पासून ऑप्शनला टाकायची मुभा द्यायची असेल तर, अभियांत्रिकी घ्यायचे का  काही, हा निर्णय आठवी नंतरच घ्यावा लागेल. कारण एकदा का मॅथ्स ऑप्शनला टाकले, कि मग अभियांत्रिकीचे दरवाजे कायमचे बंद होतात.