या मालिकेतला हा भाग इतर सर्व भागांप्रमाणे एकाच वेळी मनोगत व इतर संस्थळावर प्रकाशित करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मनोगतावर तांत्रिकदृष्ट्या स्वीकारणे कठीण आहे असा संदेश येत राहिला अन तो सोडवणे लगेच शक्य झाले नाही. काही वैयक्तिक कारणांनी पुढच्या २४ तासात या कामाला वेळ देता आला नाही. जेव्हा जमले तेव्हा लगेच लेखनातले दुवे कमी करून लेख प्रकाशित केला.
यापुढे या अडचणीची पुनरावृत्ती झाल्यास आपल्या सूचनेनुसार तळटीप जोडण्याची काळजी घेईन.
लेखनातल्या दुव्यांची संख्या मर्यादित असल्यासच ते लेखन मनोगतावर प्रकाशित करता येते असा गेल्या काही काळापासूनचा अनुभव आहे. ही मर्यादा वाढवावी अशी नम्र विनंती.