बाबूजींबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली. हिंदीत न रमण्याचे कारण गाणी अतिशय उत्तम असूनही व्यावसायिक यश न मिळणे. मालती माधव, सजनी, रत्नघर, गोकुल का चोर, आणि शेवटचा आणि बहुतेक व्यावसायिक यश मिळालेला एकमेव चित्रपट म्हणजे भाभी की चूडियां. बाबूजींना श्रेष्ठ संगीतकार अनिल बिस्वास यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करायची इच्छा होती, पण अनिल यांनी बाबूजींना तू स्वतंत्रपणे उत्तम काम करतो आहेस असे सांगितले.