संगीतकारांना पंडित, उस्ताद अशी उपाधी देण्याचा प्रघात नाही. नैशाद, मदनमोहन, रोशन, यांना कोणीही उस्ताद नौशाद अली, पंडित मदनमोहन,पंडित रोशन, असे संबोधले नाही. बाबूजी तर उत्कृष्ट गायक पण होते. तरीही कोणी त्यांना पंडित सुधीर फडके असे संबोधले नाही. मात्र हृदयनाथ मंगेशकर यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर असे संबोधण्याची पद्धत (पाडण्यात आली) आहे.व त्यांना स्वतःला पण त्यात काही गैर वाटत नाही, अगदी त्यांच्या वडीलांनी पण कधी स्वतःला पंडित दीनानाथ म्हणवून घेतले नाही, तरी सुद्धा. पंडित जसराज यांची दरबारी कानड्यातील एक सुंदर बंदिश आहे, त्याची आठवण होते.
अजब तेरी दुनिया मालिक
को जाने, को न जाने
जो जाने वा को न जाने