प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
श्रीधर संगीतरचना करतो हेही बराच काळ बाबूजींना माहीत नव्हते. त्याचे क्षेत्रही भिन्न होते.
पंडित ही पदवी हृदयनाथांना जनतेने पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांच्या हस्ते दिली. संगीतक्षेत्रात शास्त्रीय संगीतगायक जरा ज्येष्ठ झाला की त्याचा उल्लेख इतरेजन पंडित असा करू लागतात . तसे गायिकांना मात्र पंडिता का म्हटले जात नाही ? क्वचित विदुषी असा उल्लेख आढळतो. संगीतकार शास्त्रीय गायक नसल्यामुळे (मैफिलीचे) त्यांना पंडित म्हणत नसावेत . अर्थात ही लोकांनी दिलेली पदवी असल्यामुळे त्याला काही नियम लावणे अवघडच ! नाहीतर फक्त टिळकांनाच लोकमान्य का म्हणायचे ? तर महात्मा पदवी मात्र फुले आणि गांधी या दोघांनाच का ? याला ठोस उत्तर असेल असे वाटत नाही.
जवाहरलाल नेहरूंना पंडित म्हणण्याचे कारण ते काश्मिरी पंडित होते असेच होले का ? पंडित ही पदवीही आहे पण ती मिळवणारे आपल्या नावामागे पंडित असे लावतातच असे नाही.