गोष्ट छान आहे पण तशी नेहमी घडणारी आहे.
यावरून रीडर्स डायजेस्ट मधील एक चुटका आठवला. त्याचे मराठीकरण करून देत आहे.
अवंतिकाबाई त्या गावात नवीन आल्या होत्या. काही किरकोळ आजारासाठी त्या गावातील एका डॉक्टरकडे गेल्या. तिथे त्याची सर्टिफिकिटे वगैरे फ्रेम करून लावलेली होती. त्यावरील नाव आणि युनिव्हर्सिटीचे नाव वाचून त्यांच्या एकदम लक्षात आले की शाळेत आपल्या वर्गात ह्या नावाचा एक मुलगा होता. पण डॉक्टरांना दवाखान्यात येताना त्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांना वाटले की आपल्या वर्गातला मुलगा इतका वयस्क कसा असेल? पण तरीही त्यांचा नंबर आल्यावर आणि तपासणी वगैरे झाल्यावर जाता जाता त्यांनी डॉक्टरांना विचारलं,
"तुम्ही अमुकअमुक गावात अमुक अमुक शाळेत शिकलात का? "
डॉक्टर म्हणाले, "हो."
त्यावर अवंतिकाबाई प्रफुल्लित चेहऱ्याने म्हणाल्या, "म्हणजे तुम्ही माझ्या वर्गात होता! "
डॉक्टर म्हणाले, "अस्सं? कोणता विषय तुम्ही आम्हाला शिकवत होता? "
असो. कुशाग्र यांची ही कथा आणि त्यांचाच सुधीर फडक्यांवरील लेख यांना मिळालेले प्रतिसाद पाहून मनोगत पुन्हा सचेतन झाल्यासारखे वाटले!!