पंडित ही पदवी हृदयनाथांना जनतेने पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांच्या हस्ते दिली.
जनतेने म्हणजे नेमकी कोणी? साधारण पद्धत अशी आहे, कि गायक/वादक हा जेव्हां स्वतः गुरू होतो व इतरांना शिकवायला सुरुवात करतो, तेव्हां त्याला पंडित / उस्ताद असे म्हणतात. माझे असे निरीक्षण आहे कि अनेक विमानतळ व एयरलाईन स्वतःला गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट  विमानतळ व सर्वोत्कृष्ट एयरलाईन बक्षीस मिळाल्याचे सांगतात. हे कसे शक्य आहे? अगदी सोपे. बक्षीस देणारे वेगवेगळे असतात. "सर्वोत्कृष्ट  विमानतळ" म्हणजे काही नोबेल पुरस्कार नव्हे, कि ते देणारी एकच संस्था आहे. आपणच एक संस्था उभी करायची, व ती आपल्यालाच पुरस्कार देते. त्यातून,  भीमसेन जोशी व जसराज यांना "आम्ही असा कार्यक्रम करणार आहोत; हृदयनाथ यांना पंडित ही पदवी द्यायची आहे, व तुम्ही या कर्यक्रमास येवून. . . . " अशी गळ घातल्यावर नाही म्हणणे कठीण गेले असणार. असो. हे केवळ फुकाचा की-बोर्ड बडविणे. उद्या त्यांना "जनतेने"  पंडितोत्तम, संगीत सूर्य, वगैरे म्हंटले, तरी मला त्याचे काय?