त्या माझ्या लेखनावर अपूर्वाई टाइप लेखन करून स्वत:ला पु.ल.देशपांडे बनवण्याचा (समजण्याचा?) प्रयत्न करत आहे असा टीकात्मक मजकूर दुसऱ्या एका अश्याच मराठी संकेतस्थळावर लिहिला जाऊ लागला

तुम्ही प्रवास वर्णन लिहिलेत तर तुम्ही स्वत:ला पु.ल.देशपांडे बनवण्याचा (समजण्याचा?) प्रयत्न करीत आहात असा अर्थ असेल, तर मग तुम्ही इतर काही लिहिलेत, तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला जी ए कुलकर्णी / वपु/ गदिमा/ . . . इत्यादी बनवण्याचा (समजण्याचा?) प्रयत्न करीत आहात. कारण जीए/ वपु/ गदिमा/ . . . इत्यादीनी प्रवास वर्णन लिहिले नाही. आणि तुम्ही काहीच लिहिले नाहीत तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला आमदार/ खासदार बनवण्याचा (समजण्याचा?) प्रयत्न करीत आहात. कारण बहुतेक आमदार/ खासदार  यांनी काहीच लिहिले नाही. (बहुदा वाचले पण नाही). मुकेशचे "दिल जलता है तो जलने दे" हे गाणे ऐका. हुबेहूब के एल सहगल. त्याच्या वर सहगलची कॉपी करण्याचा आरोप झाला होता. म्हणून त्याने गाणे सोडले नाही. शैली जरा बदलली, येवढेच. तर, किसीका दिल जलता है, तो जलने दे.