पण आपण दिलेल्या दुव्यावर फक्त शंभर भाषान्विशयी माहिती आहे आणि त्यात सन्स्कृत चा उल्लेख सुद्धा नाही . . .

त्या दुव्यात भाषांची यादी नसून, प्रत्येक भाषा किती लोक बोलतात, याची क्रमवारी आहे. रोजच्या वापराची भाषा म्हणून संस्कृत (almost) कोणीही बोलत नाही. म्हणून त्याचा उल्लेख सुद्धा नसणे सहाजिकच आहे. लॅटिनचा पण उल्लेख नाही, कारण लॅटीन सुद्धा कोणी वापरत नाही. माझी एक सुप्त इच्छा आहे. संस्कृत भाषे संबंधित सेमिनार वगैरे होतात तिथे सर्वांना संस्कृत उत्तम येत असणारच. मंचा वरून होणारी सर्व भाषणे - सर्व अनाउन्स्मेंटस, स्वागत भाषण, संस्कृत भाषा कशी महान आहे, व ती न बोलणारे आपण कसे कपळकरंटे आहोत, वगैरे निबंध  - हे सर्व संस्कृत मधूनच होत असणार. सहाजिकच आहे. पण जेव्हां जेवणाची सुट्टी होते, तेव्हां पण सर्व उपस्थित एकमेकांशी संस्कृत मध्येच बोलतात का?  "भोः, किम उड्डाणे आगमन? एवं किम हॉटेले वास्तव्य करिष्ये" असे बोलतात, का सरळ "अरे, तुम्ही कोणत्या फ्लाईटने आलात? आणि कोणत्या हॉटेल मध्ये उतरला आहात? ", असे बोलतात?  किंवा, संस्कृतची एक प्राध्यापिका संस्कृतच्याच दुसऱ्या प्राध्यापिकेला फोन करते - "अग, आज मी येवू शकणार नाही. माझा एफवायचा तास पण तू घेशील का? "  असे मराठीत सांगते, का संस्कृत मधे सांगते? या बाबत गुप्त पणे हेरगिरी करणे ही माझी एक जुनी सुप्त इच्छा आहे.