अस्ताई म्हणजे काय? बरोबर शब्द स्थायी असा आहे. अंतरा, आभोग, संचारी, चतुरंग, इत्यादी नंतर परत परत जे गातो, म्हणून ती ओळ म्हणजे स्थायी.  पण उत्तरेकडील लोकांना अर्ध्या स पासून सुरू होणारे शब्द उचारता येत नाहीत. मग ते त्याच्या आधी एक 'अ' लावतात. जसे स्त्री च्या ऐवजी इस्त्री, स्टेशनच्या  ऐवजी इस्टेशन, स्पेशलच्या ऐवजी इस्पेशल, इत्यादी. तसेच त्यांनी स्थायी चा अस्ताई करून टाकला. असो. तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी किंवदंती स्वरूपाच्या आहेत. शेवटी तान म्हणजे काय? फुफ्फुसातील हवा बाहेर टाकणे. ती कितीही जोराने टाकली, तरी  तान घेतल्याने फासळी मोडेल हे विश्वसनीय वाटत नाही.