धन्यवाद चेतन !
आपल्या ज्ञानाबद्दल (सर्वच क्षेत्रातील) मला मुळीसुद्धा शंका नाही. त्यामुळे आपण व्यक्त केलेल्या मताचा मला मुळीच प्रतिवाद करायचा नाही.
फक्त दोन गोष्टी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
१) पुस्तकाचे नाव "अस्ताई" असेच आहे व ते मौज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे . त्यात प्रारंभी चार ओळीचे 'निवेदन' आहे व त्यात श्री. केशवराव भोळे यांनी "पुस्तकाला नाव कृष्णराव भागवत आणि राम पटवर्धन यांनी ठेवले, मी मान्य केले. " असे म्हटले आहे. कदाचित ते नाव आपण योजले असे वाटून एकादा चाणाक्ष वाचक त्यावर पुढे मागे अशी शंका उपस्थित करेल म्हणून त्यानी ही खबरदारी घेतली असावी.
२) "अस्ताई" मध्यील किस्से मी जसेच्या तसे उद्धृत केले आहेत .त्यामुळे "तुम्ही सांगितलेल्या गोष्टी किंवदंती स्वरुपाच्या आहेत" हा शेरा गैरलागू ठरतो. त्या गोष्टी मी सांगितल्या नसून श्री केशवराव भोळे यांनी सांगितल्या आहेत त्यामुळे हे आपले मतही त्यांना (पण ते आता शक्य नसल्यामुळे) किंवा त्यांच्या पुढील पिढीतील वंशजांना किंवा मौज प्रकाशनास कळवणे योग्य ठरेल..
पुस्तक esahity.com वर उपलब्ध आहे.