अस्ताई या शब्दावर माझी टिप्पणी ना तुमच्यावर व्यक्तिशः होती, ना केशवराव भोळे यांच्या वर.  पुस्तकाचे नाव अस्ताई आहे. येवढेच नव्हे, तर  मला हे ही माहीत आहे कि अनेक मोठ-मोठे गायक पण अस्ताई हाच शब्द वापरतात. तरी सुद्धा हा शब्द बरोबर होत नाही.  "तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी किंवदंती स्वरूपाच्या आहेत" हे मागे घेऊन मी "केशवराव भोळे यांनी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी किंवदंती स्वरूपाच्या आहेत" अशी दुरुस्ती करतो. आपण जे वाचतो ते विश्वास ठेवण्या योग्य आहे का नाही याची चर्चा करू शकतोच, व करावीच. त्या करता मूळ लिखाणाचा लेखक हयात असणे किंवा आपली टिप्पणी त्याच्या पर्यंत पोहोचणे जरूरी नाही. केशवराव भोळे यांनी तसे लिहिले, तरी ते किंवदंतीच आहे. कारण ही घटना ज्या काळची तेव्हां केशवराव भोळे पण नव्हते. आणि ही घटना "इतिहास" या सदरात मोडत नाही. भोळे यांच्या कथानकात इतर पण चुका आहेत. मी फक्त एक निदर्शनास आणली. जसे -  महंमदखां यांचा रागाचा पारा चढला व . . . . नोकरीवर लाथ मारून ते रेवा संस्थानात गेले व पुन्हा ग्वाल्हेरचे तोंड त्यांनी पाहिले नाही."  मग  "और एक दफे लेना" असे म्हणावयास ते ग्वालेर दरबारात कसे काय हजर होते? का हस्सूखां रेवा संस्थानात गायला गेले होते व घटना तिथे घडली?

असो. संगीता बद्दल मी जेवढे वाचन केले आहे त्या वरून माझे असे मत आहे कि संगीत विश्वात अनेक तर्कहीन समजुती रूढ आहेत, तसेच अनेक भावनात्मक समजुती आहेत, व हे सर्व डोळे मिटून ग्रहण करणे बरोबर नाही. जसे - मल्हार राग गायल्याने कोणत्याही वेळी पाऊस पडत असे. दीप राग गायल्याने दीप प्रज्वलीत होत असत, व अंगाची आग होत असे. इत्यादी. कोणत्याही मोठ्या गायका बाबत "त्यांचा षडज म्हणजे . . . अचूक" अश्या कथा असतात. पण फ्रीक्वेन्सी मीटर आल्या नंतर काही महाभागांनी अनेक गायकांच्या षडज चा अनॅलिसिस केला व असे लक्षात आले कि कोणाचाही षडज काही अचूक-बिचूक नसतो, व  आंदोलितच असतो. फरक असा, कि गायक जेवढा कसलेला, तेवढी त्याच्या आंदोलनाची रेंज कमी. तीच कथा तबला वादकांची. लय तसूभर सुद्धा हलत नाही वगैरे गप्पा ठीक आहेत. पण मेट्रोनोम बरोबर मापन केल्या वर असे लक्षात आले कि या सर्व गप्पाच होत्या.

सगळ्यात विनोदाची गोष्ट म्हणजे थाट पद्धती. पण त्या करता एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.