तुमच्या कडे फ्रीक्वेन्सी मीटर असला तरी तुम्ही यूट्यूब वरून डाउन लोड केलेल्या गाण्याच्या स्वरांचा अनॅलिसिस करू शकत नाही, कारण मूळ गाण्याचे रेकॉर्डिंग, मग ऍनलोग रेकॉर्डिंगचे डिजिटाईजेशन, मग एमपी-३ कनवर्जन, या मध्ये स्वरांच्या अचूकतेचे काही नुकसान होते. पण लयीचे कोणतेही नुकसान होत नाही. आणि मेट्रोनोम ऍप तुमच्या ऍंड्रॉईड स्मार्ट फोन वर डाउनलोड करता येते. तर, कोणत्याही थोर तबला वादकाचा सोलो डाउनलोड करा, फोन वर मेट्रोनोम ऍप डाउनलोड करा, व दोघांना सिंक करून एकत्रित वाजवा. व बघा काय गंमत होते ती.