धन्यवाद पंडित ! आप्ल्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक वाटल्यामुळे मी अस्ताई या शब्दाबद्दल विचार करू लागलो.
मौज प्रकाशन अचूकपणाबद्दल प्रसिद्ध असताना त्यातील दोन संपादक व स्वतः केशवराव भोळे या तिघांनाही पुस्तकाच्या शीर्षकासाठी "अस्ताई" शब्द कसा काय योग्य वाटला असे वाटून (अर्थात आपल्या प्रतिसादामुळेच ) मी "द न्यू स्टॅडर्ड डिक्शनरी मराठी इंग्लिश मराठी या त्रिखंडात्मक शब्दकोशाचा प्रथम खंड पाहिला व त्यात पृष्ठ ५२ वर अस्ताई हा शब्द आहे व त्याचा अर्थ The 1st of the 3 divisions of a Dhrupada ध्रूपदाच्या तीन भागांपैकी पहिला असा दिला आहे. शब्दकोशात ( पृष्ठ २४०१ तृतीय खंड)स्थायी हा शब्द संगीताच्या संदर्भात स्वतंत्रपणे दिला नसून "स्थायी वर्ण" Steady note असा दिला असून त्याचा त्याचा अर्थ "स्वस्थानी स्थिर राहणारा स्वरनाद " रागातील अथवा चीजेतील सुरवातीचा रागदर्शक पुनरावृत्त होणारा शब्द "" स्योकैः स्तोकैः प्रसन्नैः बहुमंगिभिः गीयते इति स्थायी सं. रत्नाकर असे उद्धृत केले आहे. हा शब्दकोश अगदी प्रमाण शब्दकोश समजला जातो.
यात कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर याचा शोध घेण्याचाच प्रयत्न आहे.