कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर महत्वाचे. १०० % सहमत. मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करीत आहे.
" स्योकैः स्तोकैः प्रसन्नैः बहुमंगिभिः गीयते इति स्थायी आठवी पर्यंत जेवढे संस्कृत शिकलो, तेवढेच. म्हणून या वाक्याचा अर्थ समजला नाही.
माझ्या टिप्पणी कोणत्याही ग्रंथावर आधारित नाहीत. संकृतचे माझे अज्ञान तर अगाध आहे. मी फक्त कॉमन सेन्स ने मला जे वाटले ते लिहिले. तुम्हाला सर्व ठिकाणी अस्ताई हाच शब्द सापडेल. मला पण तो अनेक ठिकाणी दिसला आहे. कारण तोच प्रचलित शब्द आहे. पण तरी सुद्धा माझ्या मते तो अपभ्रंश आहे. आणि "स्थायी" हा तर एक स्वतंत्र शब्द आहेच, म्हणून त्याचा स्वतंत्र अर्थ सापडेलच. पण स्थायी या शब्दाला स्वतंत्र अर्थ सापडला म्हणून मुखड्याला अस्ताई हा शब्द बरोबर होत नाही.
माधवराव चितळे, प्रसिद्ध जलतज्ञ, दिल्ली येथे केंद्रीय जल आयोग चे अध्यक्ष होते तेव्हांचा एक प्रसंग. चितळे साहेबांचा संस्कृतचा सखोल अभ्यास आहे, व म्हणून ते हिंदी बोलतात त्यात उर्दू कुलोत्पन्न शब्द अजिबात नसतात. शुद्ध हिंदी बोलतात. तर, एकदा एका भाषणात त्यांनी "सुवर्णश्री" नामक नदीचा उल्लेख केला. मी विचारात पडलो, ही कुठली नदी? जलविज्ञान हा माझा पण विषय असल्या मुळे भारतातील सर्व ठळक नद्यांबाबत मला माहीती होती. सुवर्णश्री हे नांव मी कधीच ऐकले नव्हते. विचारांती, व ते जे काही सांगत होते त्याचा संदर्भ लक्षात घेता समजले कि त्यांचा निर्देश अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी या नदी कडे होता. पाणी संबंधित कोणत्याही पब्लिकेशन मध्ये तुम्हाला सुबानसिरी हेच नांव सापडेल. पण तो अपभ्रंश आहे, हे चितळे साहेबांनी आमच्या ध्यानात आणून दिले. अपभ्रंशांचे हे असेच असते. ते इतके प्रचलित होतात कि
आपल्याला तेच बरोबर वाटू लागते. काही शब्दांचे अपभ्रंश होतात, तर काही शुद्ध राहतात. ऋषभ चा रिखब झाला, निषाद चा निखाद झाला, पण गंधार, मध्यम अशुद्ध झाले नाहीत. हंसध्वनी शुद्धच राहिला, पण "कौशिकध्वनी"चा मात्र "कौसी धानी" झाला. समीर चा हमीर झाला. (केवळ माझा अंदाज. फारसीत स च ह करतात. जसे, सप्ताह चा हप्ता, इत्यादी. हमीर ऐकताना थंड वाऱ्याचा भास होतो का? मला होत. व मला वाटते कि त्याचे मूल नाव समीर असेच असणार).
जाता-जाता 'ध्रुपद' हा पण अपभ्रंश आहे. (असे मला वाटते)" ध्रुवपद" असे असायला पाहिजे. तुमचे काय मत आहे?