श्री रामदास स्वामींनी, उच्चतम आदर्श गुणांचे वर्णन आणि समर्थन केलेले आहे. ते सर्वच्या सर्व आत्मसात करणे कुणाही सामान्य व्यक्तीच्या कुवतीबाहेरचे आहे. परंतु त्यातील निदान थोडेफार तरी आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे, आपल्या हाती आहे. त्यांनी सांगितलेले सर्वकाही जमत नाही, म्हणून निराश होण्याचे कारण नाही.
सांसारीक असणे, हे काही कमी पणाचे नाही. सर्वजण आध्यात्मिक, विरागी नसतातच. खरेतर बहुसंख्य जन सामान्य संसारीकच असतात. समर्थांनी देखिल सामान्य जनांना संन्यासी होण्याचा सल्ला दिलेला नाहीये. उलट त्यांनी - "उत्तम वेव्हारे -- प्रपंच करावा नेटका" असाच उपदेश केला आहे.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रत्येकाने स्वतःचा कल ओळखून राहावे. संसारात राहून वैराग्याची ओढ किंवा संन्यासाश्रमात राहून संसारी होण्याची आस --- असे "तळ्यात-मळ्यात" करणे ठीक नाही. एकदा जो धर्म स्विकारला -- की त्या अनुषंगाने येणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या -- सर्व कर्तव्यांची प्रामाणिकपणे पूर्ती करणे हेच योग्य होईल.