आपले उत्तर पटले. तरीही संतांचे विचार नुसते वाचून अथवा त्यांचे सप्ते, किंवा पारायणे करून काहीही साध्य होताना दिसत नाही.
त्याला आचरणाची जोड आपापल्या कुवतीप्रमाणे दिली तर बरे असेही वाटते. कारण संतविचार व्यवहारात आणण्यासाठी बराच मोठा बदल करावा लागतो. अन्यथा रामदासांनी(माझ्या मते रामदासांनी ) जसे म्हंटले आहे , "वोखटे ते सहावे" म्हणजे वाईट ते सहन करावे हे आपण कितपत आचरणात आणू शकू हे सांगणे कठीण आहे. नुसते एखाद्याने अरे म्हंटले तर आपण का रे म्हणतोच, मग वाईट बोलणे आपण काय सहन करणार ? असो. आपण दिलेले उत्तर खरोखरीच योग्य आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. असे लेख वाचले की निदान विचारांना चालना तरी मिळते.