१) करप्रणाली ही करदात्यावर विश्वास टाकल्यास यशस्वी होते कारण प्रत्येक करदात्यामागे एक असा सरकारी अंमलबजावणी अधिकारी उभा करता येत नाही. तस्मात, जे करचुकवेगिरी करतील त्यांच्यावर कारवाई आणि बाकीच्या सर्वांवर विश्वास हा एकमेव उपाय आहे.

लोक इतके प्रामाणिक नाहीत की कुठलीही जबरदस्ती न करता स्वतः होऊन टॅक्स भरतील.  आज नोकरदार वर्गाला मिळणारा पगार आयकर वजा करूनच हातात मिळतो. सरकारने जास्त कापलेला टॅक्स त्याला रिटर्न भरून परत मिळवावा लागतो. अश्या प्रकारे एक प्रकारची जबरदस्तीच झाल्याने आयकर भरण्याचे प्रमाण नोकरदार वर्गात सर्वात जास्त आहे. अशीच जबरदस्ती व्यावसायिक व सेवा पुरवठादारांवर जी एस टी च्या रूपात करून  सरकारने वस्तू-सेवा पुरवठादारांना नोकरदारांप्रमाणेच करचुकवेगिरी करणे कठीण केले आहे हे अतिशय चांगले केले आहे.

२) सरकारनं प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा प्रत्येक व्यवहार नेटवर अपलोड करायला लावला आहे ( जीएसटीआर १ ) !

यामध्ये काय चुकले? आज नोकरदाराला मिळणारा प्रत्येक रुपया त्याच्या पे स्लिपवर दिसतो आणि त्यावर लागू असलेला आयकर सरकार कापूनच उरलेले पैसे त्याला  देते. तोच न्याय व्यावसायिकाला लावला.

३ ) या जवळजवळ ३५० कोटी व्यवहाराचं ( तेही प्रत्येक महिन्यात), पृथ:क्करण  करून जीएसटी नेटवर्क प्रत्येक असेसीचं ( एकूण ९० लाख) परचेस रजिस्टर तयार करणार आहे ( जीएसटी -आर-२ ).   तुमच्या या रिटर्नमध्ये जेवढा जीएसटी दिसेल तेवढाच सेटऑफ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून खरेदी केलं त्याच्या मागे लागून,  त्याला त्याचं सेल रजिस्टर प्रॉपर अपलोड करायला लावणं हे खरेदीदाराचं काम आहे ! 

पुन्हा एकदा. यात काय चुकले? काम वाढले असेल. पण नक्की काय चूक आहे?

३) इनपुट क्रेडिटचा सर्व फायदा सगळे व्यावसायिक आपल्या कस्टमर्सना पास- ऑन करतील आणि त्यामुळे देशात स्वस्ताई येईल हे सरकारचं दिव्य लॉजिक आहे. कोणताही व्यावसायिक स्वतःचा फायदा कधीही पास-ऑन करत नाही. उदा. तंबाखूवर २८% जीएसटी लागल्यावर गायछाप सरळ १० ची १३ झाली. सरकारच्या अगाध ज्ञानानुसार ती किमान ९ रुपये व्हायला हवी होती,  पण असं कधीही होत नाही !

आणखी एक ठळक उदाहरण हॉटेलचं आहे. काहीही कारण नसताना हॉटेलिंग सरसकट १८% महागलं होतं. म्हणजे किंमती कमी होण्याची गोष्टच सोडा, बिनकामाची किंमतवाढ होती. आता १५ तारखेपासून सरकारनं तो दर ५% वर आणला आहे ( तेही बहुदा गुजराथ निवडणूकांमुळे). 

पण काम-ना-धाम आणि हॉटेलिंग ५% नी कॉस्टली झालं आहेच ! त्यामुळे  किंमती कमी होण्याच्या गोष्टी म्हणजे जनतेची दिशाभूल आहे.
आणि तुम्ही  म्हणता व्यावसायिक - सेवा पुरवठादार प्रामाणिक आहेत, जी एस टी नसता तरीही त्यांनी प्रामाणिकपणे टॅक्स भरला  असता. हे लोक प्रत्येक ठिकाणी पैसा कमवायची संधी शोधत असतात. खरे तर वॅल्यू ऍडेड टॅक्स जाऊन त्या जागी जी एस टी आला आहे. त्यामुळे वस्तू- सेवांच्या किंमती जवळपास तितक्याच रहायला हव्यात. पण स्वस्ताई होईल असे सांगणे हा सरकारचा अपप्रचार होता. तर वस्तू- सेवांच्या किंमती वाढवणे हा वस्तू- सेवा पुरवठादारांचा अप्रामाणिकपणा.
राहता राहिला प्रश्न लोकांचा. वस्तू- सेवा पुरवठादार किंमती इतक्याही वाढवणार नाहीत की लोकांना त्या परवडणार नाहीत. कारण तसे झाले तर ग्राहक कमी होऊन त्यांचाच तोटा होईल. त्यामुळे हे लोक किंमती वाढवताहेत, ग्राहक सुखेनैव वाढीव किंमतीने  खरेदी  करताहेत. कोटीच्या किंमतीत घरे खरेदी करणाऱ्यांना ही वाढ काहीच नाही.
सगळेच लोक असे नसतात हे ठीक आहे, पण आजकाल महागाईची बोच कमी झाली आहे असे वाटते कारण १९७०-७८० च्या काळात मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर वगैरे महागाईविरोधी मोर्चा काढीत आणि त्याला प्रचंड पाठिंबा असे. आजकाल तसे काही होताना दिसत नाही
जी एस टी चा उद्देश वस्तू- सेवा पुरवठादारांची करचुकवेगिरी थांबवण्याचा होता आणि तो सफल होताना दिसतो आहे.
विनायक