जिएसटीमुळे सर्व व्यावसायिक सर्व व्यावहार अपलोड करतील हा सरकारचा गैरसमज आहे आणि लोकात तो भ्रम पसरवून त्यांना खूष करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविकात तसं काहीही होणार नाही.
व्यावसायिक जे व्यावहार पूर्वी दाखवत नव्हते ते आताही दाखवणार नाहीत. ते पूर्वीप्रमाणे रोखीत होतील. असे व्यावहार रोखण्याचा ( लेखात म्हटल्याप्रमाणे, करदात्यावर विश्वास टाकण्यापरता) काहीही उपाय नाही.
हे थोडे कठीण वाटते. कारण दोन व्यावसायिकांमधला व्यवहार एकाने दाखवला नाही तरी दुसऱ्याने दाखवल्यास आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात घेऊन सर्व व्यावसायिक हे व्यवहार दाखवतील. नुसत्या विश्वासाने करदाते कर भरतील यावर माझा भरवसा नाही.
बाकी तुम्ही म्हणता तश्या अंमलबजावणीत अडचणी आहेत, पण तत्त्वतः काही चुकीचे दिसत नाही.
विनायक