नोटांची मोजणी चालू आहे या सबबी खाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली गेली. वास्तविकात ३० डिसेंबरलाच रिजर्व बँकेकडे किती नोटा जमा झाल्या याचा नक्की आकडा होता. ९९% नोटा जमा झाल्या हे निवडणूकांपूर्वी जाहीर झालं असतं तर जनक्षोभ उसळला असता आणि मोदी सरकारचं काही खरं नव्हतं.
अर्थात, सध्या सुद्धा मोदी नोटाबंदी आणि जिएसटीबद्दल मुद्दामच बोलणं टाळतायंत कारण गुजराथच्या अर्थकारणावर दोन्हींचा विपरित परिणाम झालेला आहे.
मोदींव्यतिरिक्त पर्याय नाही ही मोदींच्याच अंतरजालीय मंडळींनी जनमानसात निर्माण केलेली चुकीची धारणा आहे. खुद्द भाजपमध्येच यशवंत सिन्हा (वय झालं असलं तरी बुद्धी शाबूत आणि तब्येत ठणठणीत आहे), मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू असे व्यक्तिगत चारित्र्य निष्कलंक असलेले, सचोटीचे आणि चोख नेते आहेत. मोदींनी सत्तेचं केंद्रीकरण करून अमीत शहांसारख्या गुन्ह्याची शिक्षा झालेल्या, गुजराथेतून दोन वर्ष तडीपार केलेल्या आणि सध्या जामीनावर असलेल्या व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदी बसवून, चांगली माणसं खड्यासारखी बाजूला केली आहेत. तस्मात, नाईलाज म्हणून मोदी ही धारणा लोकांनी मनातून हद्दपार केली पाहीजे.